ठळक बातम्या

परराष्ट्र सेवेत रुजू होण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे यांची पुस्तके युवक-युवतींना प्रोत्साहित करतील- राज्यपाल रमेश बैस

मुंबई दि.०८ :- परराष्ट्र सेवेतील निवृत्त अधिकारी डॉ ज्ञानेश्वर मुळे यांनी लिहिलेली ‘जहाँ जहाँ चला हूं’ आणि ‘माणूस आणि मुक्काम’ ही पुस्तके युवक युवतींना परराष्ट्र सेवेत रुजू होण्यासाठी प्रोत्साहित करतील, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी काल येथे केले. डॉ. मुळे यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल बैस यांच्या हस्ते राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

कँनडास्थित डोंबिवलीकर डॉ मैथिली भोसेकर ‘मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट’ ची मानकरी

प्रकाशन सोहळ्याला मुळे यांच्या पत्नी व मुख्य आयकर आयुक्त साधना शंकर, अभिनेते जॅकी श्रॉफ, अंकीबाई घमंडीराम गोवाणी ट्रस्टच्या विश्वस्त निदर्शना गोवाणी, रमेश गोवाणी, अनुवादक शशी निघोजकर, प्रकाशक दिलीप चव्हाण, वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी उपस्थित होते. मुत्सद्दी व्यक्तीचे जीवन आव्हानात्मक असून देशसेवेसाठी त्यांना दर तीन-चार वर्षांनी अन्य देशात जावे लागते. यातून त्यांचे जीवन अनुभवसंपन्न होते.

सनातन धर्माच्या रक्षणासाठी ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान

त्यातून त्यांची विविध संस्कृती, परंपरा, भाषा व दृष्टिकोनांची समज वाढते, तसेच त्यांना आंतरराष्ट्रीय संबंध आणि जागतिक समस्यांची उत्तम जाण होते. ही अंतर्दृष्टी पुढे देशासाठी प्रभावी वाटाघाटी करण्याच्या, तसेच धोरणे तयार करण्याच्या कामात उपयोगी ठरते असे राज्यपाल बैस यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यात एका लहान गावात जन्म घेऊन आपण स्वप्नातील प्रवासाप्रमाणे कोल्हापूर, मुंबई व दिल्ली आणि त्यानंतर परराष्ट्र सेवेमुळे विविध देशांमध्ये गेलो. भौतिक, मानसिक व अध्यात्मिक स्तरावरील आपला जीवनप्रवास डिझनीलँड प्रमाणे रोमांचक होता. त्यामध्ये रोलर कोस्टर सारखे कधी आनंदाचे प्रसंग तर कधी उत्कंठावर्धक क्षण होते, असे डॉ. मुळे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *