Skip to content
मुंबई दि.०५ :- यंदाच्या गणेशोत्सवात दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन, तसेच ५ व्या, ९ व्या आणि अनंत चतुर्दशी असे चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे दहीहंडी व सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गणणती आगमन आणि विसर्जनाच्या सर्व मार्गाची तातडीने डागडुजी करण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. दहीहंडी, गणेशोत्सव उत्साहाने, शांततेत, जल्लोषात साजरे करतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.