‘म्हाडा’ मुंबई मंडळ घरांच्या सोडतीतील विजेत्यांना मुंबई मंडळाकडून तात्पुरते देकारपत्र
मुंबई दि.०४ :- ‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या ४ हजार ०८२ घरांच्या सोडतीतील ३ हजार ५०० हून अधिक विजेत्यांना मुंबई मंडळाकडून तात्पुरते देकारपत्र सोमवारी ऑनलाईन पद्धतीने वितरीत करण्यात आले. आता विजेत्यांना ४५ दिवसांत २५ टक्के, तर त्यापुढील ६० दिवसांत ७५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे उद्या काळ्या फिती लावून आंदोलन
भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या घराच्या १०० टक्के रक्कमेसह मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि देखभाल शुल्क भरणाऱ्या विजेत्याला तात्काळ घराचा ताबा दिला जाणार आहे. आता या विजेत्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत सदनिकेच्या एकूण किंमतीच्या २५ टक्के रक्कम (अनामत रक्कम वजा करन) भरावी लागणार आहे. या मुदतीत रक्कम न भरणाऱ्यास मागणीनुसार १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृहात पुस्तक विक्रीचे दालन सुरू
मात्र यासाठी व्याज आकारले जाणार आहे. या ४५ वा ६० दिवसांत (१५ दिवसांच्या मुदतवाढीसह) २५ टक्के रक्कम न भरणाऱ्यांचे घर तात्काळ रद्द केले जाणार आहे. त्यामुळे विजेत्यांनी आता तात्काळ घराची २५ टक्के रक्कम विहित मुदतीत भरणे आवश्यक आहे.
मुंबईत पुन्हा पाणीकपातीची शक्यता; सातही तलावांतील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन १ ऑक्टोबरला निर्णय
मुंबई मंडळाने १४ ऑगस्ट रोजी ४०८२ घरांसाठी सोडत काढली होती. या सोडतीत ४०७८ अर्जदार विजेते ठरले. चार घरांसाठी प्रतिसादच न मिळाल्याने त्यांची विक्री होऊ शकली नाही. नव्या सोडत प्रक्रियेनुसार अर्जदारांची पात्रता सोडतीआधीच निश्चित झाली आहे. त्यामुळे मंडळाने सोडतीनंतर अवघ्या २० दिवसांत तात्पुरते देकार पत्र वितरीत केले आहे.