‘अमृत कलश’ यात्रेतून घराघरात राष्ट्रभक्तीची भावना जागृत होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यातून ३८७ अमृत कलश दिल्लीतील अमृत वाटीकेत पाठविणार
मुंबई दि.०४ :- ‘माझी माती माझा देश’ अभियान अंतर्गत ‘अमृत कलश’ यात्रा कर्तव्य भावनेतून यशस्वी करा. या यात्रेतून राज्यातील प्रत्येक कुटुंबात, घरा-घरात राष्ट्रभक्तीचे भावना जागृत होईल असे नियोजन करण्यात यावे, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे उद्या काळ्या फिती लावून आंदोलन
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपासाठी आयोजित नवी दिल्लीतील कार्यक्रमासाठी यात ग्रामीण भागातून ३५१ आणि नागरी क्षेत्रातून प्रत्येक जिल्ह्याचे ३६ असे राज्यातून एकूण ३८७ कलश पाठवण्यात येणार आहेत. या कलशासाठी माती किंवा तांदुळ संकलनाची मोहिम ३० सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. या बैठकीस बृहन्मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.