अंधेरी येथील नव्या जलतरण तलावाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देणार – मंगल प्रभात लोढा
मुंबई दि.०५ :- बृहन्मुंबई महापालिकेने अंधेरी पश्चिम येथील गिलबर्ट हिल परिसरात बांधलेल्या नव्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाला ‘छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव’ असे नाव देण्यात येईल, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी येथे केली.
यंदाच्या गणेशोत्सवात चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरण्यास राज्य शासनाची परवानगी
या जलतरण तलावाच्या उदघाटन सोहळ्यात लोढा बोलत होते. जलतरण तलावाच्या मोकळ्या जागेत व्यायामशाळेचीही उभारणी करावी, तसेच जलतरण तलावाच्या सभासद नोंदणीत महिलांना अधिकाधिकप्राधान्य द्यावे, अशा सूचना लोढा यांनी महापालिका प्रशासनाला केल्या.
‘म्हाडा’ मुंबई मंडळ घरांच्या सोडतीतील विजेत्यांना मुंबई मंडळाकडून तात्पुरते देकारपत्र
येत्या महिन्याभरात वरळी, विक्रोळी आणि अंधेरीतील कोंडीविटा येथील जलतरण तलावाचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर काही दिवसांतच नागरिकांना त्या ठिकाणी सदस्य नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती महापालिका उपायुक्त किशोर गांधी यांनी दिली.