Skip to content
मुंबई दि.२४ :- पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यानच्या मार्गिकेचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही मार्गिका सुरू करण्यात अडथळा ठरत असलेल्या रुळालगतच्या ‘श्रीजी किरण’ या इमारतीचा अर्धा भाग तोडण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी हिरवा कंदील दाखवला. गेल्या आठ वर्षांपासून हे काम रखडले होते.
या इमारतीच्या अर्ध्या भागात राहणारे जमीन मालक सुधीर धारिया व त्यांच्या कुटुंबीयांना तात्पुरते अन्यत्र स्थलांतर होण्याकरिता पंधरा दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्यांचे स्थलांतर होईपर्यंत अर्धा भाग तोडण्याचे काम करू नये, असशी सूचनाही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय, न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने पश्चिम रेल्वे प्रशासनाला केली आहे.