Skip to content
मुंबई दि.२२ :- पंतप्रधान कार्यालयामार्फत (पीजी पोर्टल) प्राप्त झालेल्या तक्रारी येत्या ३१ ऑगस्टपर्यंत निकालात काढण्याचे आदेश राज्य शासनाने सर्व प्रशासकीय विभागांना दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत तक्रारींचे पूर्णत: निराकरण करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालात तशी विशेष नोंद केली जाणार आहे.
त्यामुळे मंत्रालयातील सर्वच विभागातील अधिकारी पीजी पोर्टलमार्फत प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत. पीजी पोर्टलमार्फत या तक्रारी राज्य शासनाच्या संबंधित विभागांकडे पाठविल्या जातात.
परंतु तक्रारीचे स्वरुप वैयक्तिक व किरकोळ असल्याचे कारण सांगून, त्याकडे कुणी फारसे लक्ष देत नाही. परंतु आता केंद्र सरकारचे पीजी पोर्टल व राज्य शासनाचे आपले सरकार प्रणालीचे एकत्रिकरण करण्यात येणार असल्याने पीजी पोर्टलमार्फत प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सर्व विभागांना दिल्या आहेत.