ठळक बातम्या

सनी देओल यांच्या बंगल्याचा लिलाव रद्द

मुंबई दि.२२ :- अभिनेते आणि खासदार सनी देओलच्या जुहू येथील बंगल्याचा लिलाव रद्द करण्यात आला आहे. तांत्रिक कारणामुळे लिलाव रद्द करण्यात आल्याचे तसेच सनी देओल थकीत रक्कम भरणार असल्याने लिलाव रद्द केल्याचेही बँकेकडून सांगण्यात आले.
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण
बँक ऑफ बडोदाने ५६ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी बंगल्याच्या लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. सनी देओल यांनी कर्जाची, थकबाकीची परतफेड करण्यासाठी संपर्क साधला असल्याचे बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आले.
मंदिरांतील चोर्‍या रोखण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने पुढाकार घ्यावा – ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची मागणी
कर्जाची परतफेड न केल्याने त्याच्या बंगल्याचा लिलाव करण्यात येणार होता. कर्जाच्या वसुलीसाठी येत्या २५ सप्टेंबरला या बंगल्याचि लिलाव करण्यात येणार होता. त्यासाठी ५१ कोटी ४३ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *