मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय संचालित इतिहास संशोधन मंडळातर्फे चर्चासत्र
मुंबई दि.२८ :- मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या (१८९८ – २०२३) सांगतेनिमित्त मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय संचालित इतिहास संशोधन मंडळातर्फे येत्या ३० जुलै रोजी एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्राचा विषय ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि समकालीन महाराष्ट्र’ हा असून चर्चासत्रास अध्यक्ष म्हणून डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि प्रमुख वक्त्या म्हणून इतिहास-अभ्यासक डॉ. प्राची देशपांडे उपस्थित राहणार आहेत. त्या ‘महाराष्ट्राचा इतिहास आणि वर्तमान : आंतरसंबंध’ या विषयावर आपले विचार मांडतील.
मुस्लिम समाजाच्या सशक्तीकरणात अंजुमन इस्लामचे योगदान उल्लेखनीय – राज्यपाल रमेश बैस
“शेती आणि पर्यावरण’ या विषयावरील पहिल्या सत्रात सोमिनाथ घोळवे आणि परिणीता दांडेकर भूमिका मांडतील. या सत्रात डॉ.जास्वंदी वांबूरकर आणि साईली पलांडे-दातार या चर्चक असतील. दुसऱ्या सत्रात डॉ. शरद जावडेकर महाराष्ट्राच्या शिक्षणावर, तर डॉ. नीरज हातेकर उद्योग आणि रोजगारावर आपले विचार मांडतील. या सत्राचे चर्चक अनुक्रमे डॉ. अवनीश पाटील आणि डॉ. नारायण भोसले असतील.
नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
तिसऱ्या सत्रात ‘प्रादेशिकता व संघराज्य व्यवस्था’ या विषयावर डॉ. भालचंद्र मुणगेकर, तर ‘महाराष्ट्राचे भाषा धोरण’ या विषयावर डॉ. प्रकाश परब आपली मते मांडतील. डॉ. श्रद्धा कुंभोजकर व डॉ. नीतीन रिंढे या सत्राचे चर्चक असतील. हे चर्चासत्र शारदा मंगल कार्यालय, तिसरा मजला, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व), मुंबई येथे होणार आहे. चर्चासत्र निःशुल्क असून सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क ९८२०४३७६६५
