नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
मुंबई दि.२८ :- सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. नुकसानीसाठी प्रती कुटुंब दहा हजार रुपये वाढीव मदतीची आणि दुकानदार , टपरी धारक यांनाही आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ही वाढीव मदत जून ते ऑक्टोबर २०२३ या चालू पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीसाठी देण्यात येईल.
महिला स्वयंसहाय्यता गटांना दुपटीने अर्थसहाय ६० लाखांहून अधिक महिलांना लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सध्या घर पाण्यात बुडालेले असल्यास, घर पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा पूर्णपणे पडले असल्यास कपडयांच्या नुकसानीकरिता प्रति कुटुंब २ हजार ५०० रुपये आणि घरगुती भांडी/वस्तु यांच्या नुकसानीकरिता प्रति कुटुंब २ हजार ५०० रुपये असे एकूण पाच हजार रुपये देण्यात येतात. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची अट शिथिल करून ही रक्कम आता दुप्पट करण्यात येत आहे. कपड्यांचे नुकसान आणि घरगुती भांडी कुंडीच्या नुकसानीसाठी आता दहा हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीत दुकानदारांना राज्य आपत्ती निधीत कुठलीही मदत देण्यात येत नाही. ही बाब लक्षात घेऊन त्यांनाही आर्थिक मदत देण्याचि निर्णय घेतला आहे.
कुलकर्णी परिवारातर्फे ‘मल्हार रंग‘ कार्यक्रमात कौस्तुव गांगुली यांचे गायन
दुकान पाण्यात बुडालेले असल्यास, दुकान पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा दुकानांचे संपूर्ण नुकसान झाले असल्यास अशा दुकानदारांना पंचनाम्याच्या आधारे नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येईल. जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे आणि जे शिधापत्रिकाधारक आहेत अशा दुकानदारांपैकी अधिकृत दुकानदारांनाच ही मदत मिळेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. अशीच मदत अधिकृत नोंदणीकृत व परवानाधारक टपरीधारकांना देण्यात येईल. प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त दहा हजार रुपयां पर्यंत विशेष बाब म्हणून ही मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
