मुस्लिम समाजाच्या सशक्तीकरणात अंजुमन इस्लामचे योगदान उल्लेखनीय – राज्यपाल रमेश बैस
मुंबई दि.२८ :- गेल्या दीडशे वर्षांपासून शिक्षण, कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या अंजुमन ई इस्लाम संस्थेने देशाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात तसेच मुस्लिम समाजाच्या सशक्तीकरणामध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी काल येथे काढले.
नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
अंजुमन- ई – इस्लाम शैक्षणिक संस्था स्थापनेच्या १५० व्या वर्षपूर्ती महोत्सवाचे उदघाटन राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत मुंबई सेंट्रल येथील सैफ तय्यबजी मुलींच्या शाळेच्या सभागृहात झाले, त्यावेळी बोलत होते. यावेळी संस्थेत अध्यापन करत असलेल्या आणि गेल्या पाच वर्षात पीएचडी प्राप्त करणाऱ्या ५७ शिक्षकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महिला स्वयंसहाय्यता गटांना दुपटीने अर्थसहाय ६० लाखांहून अधिक महिलांना लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘अंजुमन’चे अध्यक्ष डॉ झहीर काझी, वरिष्ठ उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ रविंद्र कुलकर्णी तसेच संस्थेचे विश्वस्त प्राचार्य, शिक्षक व माजी विद्यार्थी उपस्थित होते. जवळपास शंभर शैक्षणिक संस्थांचे संचलन करणाऱ्या अंजुमन संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी देशात अनेक क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केली आहे असे नमूद करून संस्थेने आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘शिक्षक प्रशिक्षण अकादमी’ तयार करुन देशासाठी उत्कृष्ट शिक्षक निर्माण करावे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
