ठळक बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुरपरिस्थितीचा आढावा अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदत

व पुनर्वसनासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई दि.२६ :- अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांचा जीव वाचविणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदत आणि पुनर्वसनासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.

अधिवेशनाचा कालावधी पूर्ण करा; चार ऑगस्टपर्यंत सभागृह चालवा – बाळासाहेब थोरात

राज्यातील अतिवृष्टी, पुरस्थिती व अवर्षण परिस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यानी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडुन दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. आपत्ती निवारण, पुरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही. पूरामुळे ज्या गावात घरात, रस्त्यावर गाळ साचला असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी ‘राज्य आपत्ती प्रतिसाद मदत निधी’ तसेच जिल्हा परिषदेतील निधीचा उपयोग करावा. प्रत्येक जिल्ह्याला दिलेला ३० लक्ष रुपयांचा आगाऊ निधी वापरावा. निधी कमी पडल्यास तातडीने निधीची मागणी करण्याची सुचना उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.

कारगिल विजय दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते आसाम व अरुणाचल प्रदेशला रुग्णवाहिका भेट

नदी, नाल्यातील अतिक्रमण काढण्याचे काम प्राधान्याने व कठोर भूमिका घेऊन पार पडावे. नदी, नाल्यातील गाळ काढण्याचे काम कंत्राटदारांची यंत्रसामुग्री वापरून प्रशासनाने डिझेलची व्यवस्था करावी. १५ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम पूर्ण करावी. तसेच गाळ काढल्यानंतर तो पुन्हा नदी, नाल्यात जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, विहार तलाव ओसंडून वाहू लागले

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव , वित्त विभागाचे अपर मुख्य मुख्य सचिव नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, आपत्ती नियंत्रण कक्षाचे संचालक आप्पासो धुळाज, आपत्ती नियंत्रण कक्षाचे उपसचिव डॉ. श्रीनिवास कोतवाल आमदार संजय कुटे तसेच सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *