कारगिल विजय दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते आसाम व अरुणाचल प्रदेशला रुग्णवाहिका भेट
मुंबई दि.२६ :- कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी आसाम व अरुणाचल प्रदेश राज्य सैनिक कल्याण मंडळांना प्रत्येकी एक रुग्णवाहिका भेट देण्यात आली. हुतात्मा जवान तसेच माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या अथर्व फाउंडेशनच्या वतीने दोन्ही राज्यांना ही भेट देण्यात आली.
मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, विहार तलाव ओसंडून वाहू लागले
देशाचे वीर जवान प्रतिकुल परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करीत असतात. अश्यावेळी हौतात्म्य प्राप्त झालेल्या जवानांच्या तसेच माजी सैनिकांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी काम करणे नागरिकांचे कर्त्यव्य असते असे सांगून राज्यपालांनी अथर्व फाउंडेशनचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाला अथर्व फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार सुनील राणे, निमंत्रक कर्नल (नि.) सुधीर राजे, कर्नल एस. चॅटर्जी, डॉ बालाजी शिंदे व आसाम रायफलचे अधिकारी व जवान उपस्थित होते.
