ठळक बातम्या

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, विहार तलाव ओसंडून वाहू लागले

मुंबई दि.२६ :- मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा आणि विहार तलाव तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तुळशी तलाव याआधीच भरून वाहू लागला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तीन तलाव पूर्ण भरले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार नाही – उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान परिषदेत स्पष्टीकरण

दरम्यान तानसा तलाव ओसंडून वाहू लागल्याने तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तानसा नदीकाठच्या शहापूर, भिवंडी, वाडा, वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, अशी सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *