अधिवेशनाचा कालावधी पूर्ण करा; चार ऑगस्टपर्यंत सभागृह चालवा – बाळासाहेब थोरात
मुंबई दि.२६ :- विधानसभेचे हे सभागृह अत्यंत महत्त्वाचे असून या सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर विचार होत असतो. अनेक समस्या सोडवल्या जातात. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी पूर्ण करून चार ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालवावे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.
कारगिल विजय दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते आसाम व अरुणाचल प्रदेशला रुग्णवाहिका भेट
सभागृहात चर्चेच्या दरम्यान ते बोलत होते. अधिवेशनामध्ये अनेक छोटे-मोठे प्रश्न उपस्थित करण्यात आले, त्या प्रश्नांना या निमित्ताने वाचा फुटली. प्रशासन गतिमान झाले. या अत्यंत चांगल्या गोष्टी आहेत या सभागृहाचा हेतू प्रश्न सुटावे हा आहे. त्यामुळे अधिवेशन पूर्ण काळ चालवावे जेणेकरून प्रत्येक सदस्याला न्याय देता येईल, असेही ते म्हणाले.
