भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी लवकरच सर्वकष धोरण
मुंबई दि.२१ :- भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी सर्कष धोरण निश्चित करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक मोठय़ा गावात, तालुक्यात, शहरात, महानगरात श्वान गणना व त्यांची नोंदणी करून भटके व पाळीव कुत्रे किती आहेत, यांची संख्या निश्चित करायची आहे.
ठाणे जिल्ह्यात येत्या २४ तासात अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा
एकही भटका कुत्रा रस्त्यावर राहणार नाही, त्यासाठी काय उपाययोजना करता येतील तसेच श्वान दत्तक योजना राबिवण्यात येईल का? , त्याबाबतही समितीला सूचना करायच्या आहेत.
खड्ड्यांमुळे दुर्घटना घडली तर ठेकेदार आणि संबंधित अभियंत्यावर कारवाई – कडोंमपा प्रशासनाचा इशारा
पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नगरविकास, आरोग्य व ग्रामविकास विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश या समितीत आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोणती कार्यवाही करावी, याबाबतचे निर्देश नगरविकास विभागाने यापूर्वी दिलेले आहेत. आता त्याबाबतचे सविस्तर असे धोरण निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
