ठळक बातम्या

डेंग्यूच्या चाचणीचे शुल्क निश्चित करण्यासाठी समिती स्थापन

 खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळे दर
६०० रुपये शुल्क आकारण्याचा आदेश धाब्यावर

मुंबई दि.२१ :-  राज्यातील अनेक खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळांमध्ये डेंग्यूच्या चाचणीसाठी वेगवेगळे दर आकारण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर डेंग्यू चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने विशेष समिती स्थापन केली आहे.

भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी लवकरच सर्वकष धोरण

खासगी रुग्णालये किंवा प्रयोगशाळांमध्ये डेंग्यू रुग्णांच्या चाचणीसाठी ६०० रुपये शुल्क आकारण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र तरीही या चाचणीसाठी वेगवेगळे शुल्क आकारण्यात येते. रुग्णांची होणारी आर्थिक लूटमार रोखण्यासाठी जे.जे. रुग्णालयातील पॅथॉलॉजी विभाग प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात येत्या २४ तासात अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा

समितीमध्ये जे.जे. रुग्णालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे विभागप्रमुख, आरोग्य सेवा (रुग्णालये) संचालक, आरोग्य सेवा संचालनालयाचे उपसंचालक, खासगी वैद्यकीय पॅथॉलॉजिस्ट आणि खासगी मायक्रो बायोलॉजिस्ट यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *