खड्ड्यांमुळे दुर्घटना घडली तर ठेकेदार आणि संबंधित अभियंत्यावर कारवाई – कडोंमपा प्रशासनाचा इशारा
कल्याण दि.२१ :- खड्डे बुजविण्याच्या कामात हलगर्जीपणा झाला आणि खड्ड्यांमुळे काही दुर्घटना घडली तर त्याला ठेकेदार व त्या रस्त्याशी संबंधित अभियंत्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिला आहे.
शहरातील खड्डे बुजविण्यासाठी ठेकेदार, त्यांच्यावर नियंत्रक अभियंते नेमले आहेत. तरीही खड्डे बुजविण्याची कामे प्राधान्याने केली जात नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.
इरशाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय
कल्याण डोंबिवली महपालिका हद्दीतील रस्त्यांवर मुसळधार पावसामुळे खड्डे पडले आहेत. पाऊस नसताना तातडीने हे खड्डे बुजविण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
