ठळक बातम्या

ठाणे जिल्ह्यात येत्या २४ तासात अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा

मुंबई दि.२१ :- आगामी २४ तासात ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

खड्ड्यांमुळे दुर्घटना घडली तर ठेकेदार आणि संबंधित अभियंत्यावर कारवाई – कडोंमपा प्रशासनाचा इशारा

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी जिल्ह्यातील यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

एक देश, एक करप्रणाली’ सूत्रानुसार जीएसटी कायद्यात संबंधीत दुरुस्ती – महाराष्ट्र वस्तू, सेवाकर (सुधारणा) विधेयक मंजूर

तालुका तसेच महानगरपालिका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाबरोबरच एनडीआरएफ, आपदा मित्र, टीडीआरएफ पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *