सामाजिक

महिला बचत गटांसाठी विक्री केंद्र सुरू करण्याची पालकमंत्री दिपक केसरकर यांची सूचना

मुंबई, दि. १३
‘एफ दक्षिण’ विभागातील महिलांसाठी सुविधा केंद्र उभारून याठिकाणी त्यांना आठवड्यातून एकदा वस्तू विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची सूचना मुंबई शहर पालकमंत्री दिपक केसरकर यांनी काल येथे केली. त्यांनी दिले.
बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागातील रहिवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केसरकर बोलत होते.

बाणगंगा परिसराचा विकास आणि सुशोभिकरण होणार

खासदार राहुल शेवाळे, आमदार कालिदास कोळंबकर, डॉ. मनीषा कायंदे, बृहन्मुंबई महापालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यावेळी उपस्थित होते.
परिसरात पोलिसांची गस्त वाढविणे, पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणे, महिला बचत गटांसाठी विक्री केंद्र उपलब्ध करून देणे, त्यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित करणे, सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढविणे, महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना सुविधा उपलब्ध करणे, नालेसफाई, या विषयी नागरिकांनी सूचना मांडल्या.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी साठी ‘रिड इंडिया’ उपक्रम- दीपक केसरकर

ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार असून येत्या महिनाभरात त्याची कार्यवाही सुरू होईल. जाण्या-येण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादन विक्रीसाठी आठवड्यातून एक दिवस जागा उपलब्ध करून देण्यात यावी, टाटा रुग्णालयात देशभरातून रुग्ण येतात, त्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी महापालिकेने सुविधा उपलब्ध करून देण्याची आणि त्यांच्या जाण्या-येण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वाहन व्यवस्था करण्याची सूचनाही केसरकर यांनी केली.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *