सामाजिक

बाणगंगा परिसराचा विकास आणि सुशोभिकरण होणार

मुंबई, दि. १२
दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध वारसा स्थळ आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या बाणगंगा तलाव परिसराचे लवकरच सौंदर्यीकरण आणि विकास करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समिती आणि बृहन्मुंबई महापालिकेमार्फत या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

BMC: रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी आणखी नऊ यांत्रिकी झाडूंची खरेदी

पहिल्या टप्प्यात तलावातील अतिक्रमीत बांधकामे काढून परिसरात धार्मिक स्थळाला साजेशी रोषणाई करणे, परिसरातील घरांना एकसारखी रंगसंगती करणे, तलावातील वाहून जात असलेले पाणी थांबवणे ही कामे केली जाणार आहेत.

महापालिकेच्या तरण तलावांमध्ये पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळणार

मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी एका बैठकीत या कामांचा आढावा घेतला. बृहन्मुंबई महापालिकेच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांच्यासह जीएसबी, काशीमठ आदी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

मी माझे कर्तव्य पार पाडले- किरीट सोमय्या

नैसर्गिक सौंदर्याला बाधा न येता तलावाकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्यांची दुरूस्ती, ज्येष्ठ नागरिकांना आधारासाठी रेलिंग, कपडे बदलण्यासाठी खोली, स्वच्छतागृह आदी कामे करण्यात यावीत अशा सूचनाही केसरकर यांनी या बैठकीत केल्या.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा आता २३ टक्के,

परिसरातील झोपडीधारकांना इतरत्र हलविणे, तलावातील अतिरिक्त माशांची व्यवस्था आदींबाबत म्हाडा, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, महापालिका, मत्स्यव्यवसाय विभाग आदींची एकत्रित बैठक आयोजित केली जावी, असेही केसरकर यांनी सांगितले.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *