विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी साठी ‘रिड इंडिया’ उपक्रम- दीपक केसरकर
मुंबई, दि. ११
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ‘रिड इंडिया’ उपक्रम राबविला जात आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळेत वाचनाची सवय लावण्याची सूचना करून ‘रिड महाराष्ट्र’ अंतर्गत वाचनालयांची संख्या वाढविण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल येथे दिली.
बाणगंगा परिसराचा विकास आणि सुशोभिकरण होणार
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांमध्येच कोरी पाने देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय यावर्षी घेण्यात आला आहे. याबाबत त्यांनी काल दूरदृश्यप्रणालीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
महापालिकेतर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आणखी तीन सीबीएसई शाळा सुरू
केसरकर यांच्यासमवेत शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी, उपसचिव समीर सावंत, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, मुंबई विभागीय उपसंचालक संदीप संगवे आदी उपस्थित होते. तर, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी तसेच विभागीय आणि जिल्हा पातळीवरील अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
गुणवत्ता वाढीसाठी विशेष कृती आराखडा – यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी व्हावे यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्यात आली आहेत. शाळेतच टिपण काढण्याच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सक्षमीकरणास मदत होत असल्याने यांचा उपयोग कसा करावा यादृष्टीने सर्व शाळांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार या पानांचा योग्य वापर होईल याची दक्षता शाळांनी घ्यावी, असे केसरकर यांनी सांगितले.
तृतीयपंथी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नोंदींमध्ये पूर्वी नमूद केलेले नाव,लिंग बदलण्याची परवानगी
प्रत्येक शाळेत आजी-आजोबा दिवस साजरा करावा, शेती या विषयाचा लवकरच अभ्यासक्रमात समावेश करण्यात येत असल्याने शाळेत किचन/ टेरेस गार्डन तयार करून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह अनुभव देण्यात यावा, तसेच पर्यावरण रक्षण, स्वच्छता आदी बाबतीतही विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही केसरकर यांनी केल्या.
——