झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना मंजुरी देण्यासाठी समिती स्थापन
मुंबई, दि. १३
रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यास मंजुरी देण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव (गृहनिर्माण) या समितीचे अध्यक्ष आहेत.
महिला बचत गटांसाठी विक्री केंद्र सुरू करण्याची पालकमंत्री दिपक केसरकर यांची सूचना
विकासकांमार्फत प्राप्त निविदांची छाननी करुन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सादर केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेणे, अभय योजनेअंतर्गत वित्तीय संस्था/ त्यांनी प्राधिकृत केलेल्या सक्षम संस्थेस ही योजना पूर्ण करण्यास मंजुरी देणे आदी कामे ही समिती करणार आहे.
निवडणुकीपूर्वी काही गुन्हेगारांना तुरुंगातून बाहेर काढण्याचे षडयंत्र- संजय राऊत
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक हे या समितीचे सदस्य असून गृहनिर्माण विभागाचे उप सचिव (झोपसु-१) हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.
——-
