राजकीय

राष्ट्रवादीचे नऊ जण अद्याप बिनखात्याचे मंत्री

मुंबई, दि. १०
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांच्या शपथविधीला काल एक आठवडा पूर्ण झाला. मात्र मंत्र्यांना अद्याप खातेवाटप झालेले नाही.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्टदरम्यान

पुढील सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता आहे.

मीरा रोड येथील ‘टिपू सुलतान चौका’चे नाव बदलण्यात यावे- विश्व हिंदू परिषदेची मागणी

हा विस्तार झाल्यावरच खातेवाटप केले जाणार असल्याचे सांगण्यात येते. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला १७ जुलैपासून सुरुवात होणार आहे.

शिवसेना मुस्लिमांच्या विरोधात नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याआधी पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार करून शिवसेना आणि भाजपच्या काही आमदारांना मंत्रीमंडळात घेतले जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करूनच विस्ताराबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *