शिवसेना मुस्लिमांच्या विरोधात नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १०
शिवसेना मुस्लिमांविरोधात नसून आमच्या सरकारचा सर्वाना समान न्याय आहे. मुंबई-ठाण्यात आम्ही मंदिरांबरोबरच मशिदीही वाचविल्या, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे केले.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्टदरम्यान
शिवसेना अल्पसंख्याक विभागाचा मेळावा षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी सईद खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
शिवसेना आणि उबाठा गटाच्या सर्व आमदारांना विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस
राज्यात महिनाभरात मुस्लीम महिलांच्या २ हजार ८०० बचत गटांना मान्यता दिली जाणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी यावेळी केली.
सर्व धर्मांचा आदर करावा, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती.
पाठीत खंजीर खुपसण्याचे संस्कार माझ्यावर नाहीत- पंकजा मुंडे
त्यांचे विचार घेऊनच राज्य सरकार वाटचाल करीत आहे. शिवसेना मुस्लिमांविरोधात नसतानाही काही जण मतांच्या राजकारणासाठी गैरसमज निर्माण करीत आहेत, असेही शिंदे म्हणाले.
——–
.
