जयंत पाटील यांनी दाखल केलेली याचिका पूर्ण वाचून निर्णय – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
मुंबई, दि.३
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नऊ आमदारांच्या विरोधात दाखल केलेली अपात्रतेची मिळाली आहे. याचिकेत नेमके काय म्हटले आहे हे पूर्ण वाचल्यानंतर मी त्यावर निर्णय घेईन, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज येथे सांगितले.
याचिकेबाबत राहुल नार्वेकर यांना विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते आज मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
सभागृहात विरोधी पक्षनेतेपदाला मान्यता विधानसभा अध्यक्ष देतात. तो अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाला अजित पवार आणि अन्य आमदारांची साथ- चंद्रशेखर बावनकुळे
या अधिकारांचा वापर करताना विधानसभा अध्यक्षांना विधानसभेच्या नियमांचा व संवैधानिक तरतुदींचा विचार करून योग्य निर्णय घेणे अपेक्षित असते, असेही नार्वेकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच सरकारमध्ये सामील झालो- उपमुख्यमंत्री अजित पवार
अजित पवारांना किती आमदारांचं पाठबळ आहे? या प्रश्नावर नार्वेकर म्हणाले, त्यांना किती आमदारांचे पाठबळ आहे याविषयी अद्याप कोणतीही माहिती नाही.
—-
