Skip to content
Sunday, October 18, 2026
Latest:
  • डोंबिवलीतील नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत यशस्वी चढाई!
  • मराठी रंगभूमीवर OTT च्या धाटणीचा अनोखा प्रयोग – ‘ति ची गोष्ट’
  • “काय हिंदू बीफ खातात?’ ध्रुव राठी यांच्या या वादग्रस्त व्हिडिओवरून वाद वाढला, एफआयआर दाखल करण्याची मागणी तीव्र
  • राहुल गांधींच्या ‘खोटेपणाचा बुरखा’ पुन्हा उघड, विनोद तावडेंचा जोरदार निशाणा
  • रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट आणि के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन; थॅलेसेमिया रुग्णांसाठी ८६ रक्त पिशव्यांचे संकलन

  • Home
  • राजकीय
  • साहित्य- सांस्कृतिक
  • सामाजिक
  • English Website
  • हिन्दी Website
सामाजिक

महाड येथे ‘राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२६’ आणि पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची प्रमुख उपस्थिती

July 1, 2026 rajesh

विशेष प्रतिनिधी, महाड:

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती आणि ‘सामाजिक न्याय दिनाचे’ औचित्य साधून महाड येथील ऐतिहासिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे एक दिवसीय ‘राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२६’ आणि ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार’ वितरण सोहळा रविवारी अत्यंत उत्साहात पार पडला.

विवेक विचार मंच, बार्टी (BARTI), आर्टी (ARTI), डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (लोणेरे) आणि महाराष्ट्रातील विविध सहयोगी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो सामाजिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती, ज्यात कल्याण येथून आलेल्या ४५ बांधवांचाही समावेश होता.

“सामाजिक समता समरसता वर्ष” आणि परिषदेची पार्श्वभूमी

या परिषदेला अत्यंत ऐतिहासिक व प्रेरणादायी पार्श्वभूमी लाभली होती. संत रविदास महाराज यांचे ६५० वे जयंतीवर्ष, महात्मा ज्योतिराव फुले यांचे २०० वे जयंतीवर्ष, संत गाडगे महाराज यांचे १५० वे जयंतीवर्ष तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचे हे शताब्दी वर्ष आहे. या सर्व घटनांचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने सन २०२६-२७ हे वर्ष “सामाजिक समता समरसता वर्ष” म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील वंचित घटकांमध्ये कार्य करणाऱ्या संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन संवाद साधावा, या उद्देशाने ही परिषद महाड येथे आयोजित करण्यात आली होती.

सरकारी योजनेला सेवेचा अर्थ! मानसिक अस्वस्थतेवर मात करत विकास देशमुख यांनी घडवले सामाजिक परिवर्तन

देशातील व राज्यातील दिग्गजांची उपस्थिती

या सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार व संसदीय कामकाज मंत्री मा. किरेन रिजिजू यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती-जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री दादा इदाते आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे उपस्थित होते.

कार्यक्रमाला महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री मा. संजयजी शिरसाट, बार्टीच्या प्रभारी महासंचालक श्रीमती दीपा मुधोळ मुंडे, आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुनील वारे आणि लोणेरे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजनिश कामत यांची सन्माननीय उपस्थिती होती. स्वागत समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. संजय सहदेव भिसे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. तर जयवंत तांबे व अ‍ॅड. प्रबोधन निकाळजे यांनी या परिषदेच्या यशस्वी संयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

१० संस्था व कार्यकर्त्यांना ‘सामाजिक न्याय पुरस्कार’ प्रदान

सामाजिक न्यायाच्या आणि समतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील १० संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या सोहळ्यात “छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले. विवेक विचार मंचाच्या वतीने त्यांच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा सन्मान प्रदान करण्यात आला.

वारी स्वच्छ, पर्यावरण सुरक्षित! ‘निसर्गवारी’ अभियानाची विठूरायाच्या चरणी १५ वर्षांची अखंड सेवा; कचरामुक्त वारीचा संकल्प

हा संपूर्ण सोहळा रविवार, २८ जून २०२६ रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:०० या वेळेत पार पडला. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या परिषदेने सामाजिक समरसेचा एक नवा संदेश दिला आहे.

  • सोलापूर येथील अनधिकृत चर्च आणि मनपा सेवकाच्या गैरकृत्यांची चौकशी होणार; हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र सेनेच्या पाठपुराव्याला यश
  • भाजप म्हणजे पत्त्यांचा बंगला, नरेंद्र मोदी सरकले तर संपूर्ण पक्ष कोसळेल!”; राज ठाकरेंचे ठाण्यात सर्वात मोठे विधान

Recent Posts

  • डोंबिवलीतील नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत यशस्वी चढाई!
  • मराठी रंगभूमीवर OTT च्या धाटणीचा अनोखा प्रयोग – ‘ति ची गोष्ट’
  • “काय हिंदू बीफ खातात?’ ध्रुव राठी यांच्या या वादग्रस्त व्हिडिओवरून वाद वाढला, एफआयआर दाखल करण्याची मागणी तीव्र
  • राहुल गांधींच्या ‘खोटेपणाचा बुरखा’ पुन्हा उघड, विनोद तावडेंचा जोरदार निशाणा
  • रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट आणि के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन; थॅलेसेमिया रुग्णांसाठी ८६ रक्त पिशव्यांचे संकलन

Recent Comments

No comments to show.

About Us


अनुभवी पत्रकारो द्वारा मुंबई और परिसर में घटित घटनाओंका वार्तांकन और विश्लेषण. मूलतः डोंबिवली कल्याण परिसर और मुंबई तथा उपनगर की वार्ता.

Other Highlights

Others

Copyright © 2026 . All rights reserved.
Theme: ColorMag by ThemeGrill. Powered by WordPress.