राजकीय

अपात्र ठरू नये यासाठी अजित पवार यांना ३६ आमदारांचा पाठिंबा आवश्यक

मुंबई, दि. ३
पक्षांतरबंदी कायद्यान्वये अपात्र ठरू नये यासाठी अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ आमदारांपैकी ३६ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.

जयंत पाटील यांनी दाखल केलेली याचिका पूर्ण वाचून निर्णय – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

राष्ट्रवादीचे विधानसभेत ५३ आमदार आहेत. ३६ आमदारांनी पाठिंबा दिल्यास दोन तृतीयांश संख्याबळ होऊ शकते. विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन ते चार आमदार अजित पवार यांच्या बरोबर आहेत.

महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार शिवसेना भाजप सरकारमध्ये सहभागी

विधान परिषदेच्या २१ जागा सध्या रिक्त आहेत. ५७ पैकी भाजपचे २२ आमदार आहेत. राष्ट्रवादी व शिवसेनेतील बंडखोर तसेच अपक्षांच्या मदतीने ३० चे संख्याबळ होते. यामुळे पावसाळी अधिवेशनात सभापतीपदासाठी निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे.

आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच सरकारमध्ये सामील झालो- उपमुख्यमंत्री अजित पवार

माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे त्यांच्याच नावाची सभापतीपदासाठी चर्चा आहे.

आमचे सरकार आल्यावर आम्ही आणि पोलीस तुमची जागा दाखवून देऊ- आदित्य ठाकरे

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निंबाळकर यांचे जावई आहेत. विधान परिषदेच्या सभापतीपदी निंबाळकर यांची निवड झाली तर सासरे आणि जावई अशी जोडी विधानसभा आणि विधान परिषदेत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *