इयत्ता अकरावीची दुसरी प्रवेश यादी जाहीर
मुंबई, दि. ३
मुंबई महानगरक्षेत्रातील इयत्ता अकरावी प्रवेशाची दुसरी प्रवेश यादी आज सकाळी दहा वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आली. मुंबईतील नामांकित महाविद्यालयातील प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) हे दुसऱ्या फेरीतही नव्वदपार आहेत. १ लाख ७६ हजार ४९३ जागांसाठी दुसऱ्या प्रवेश यादीअंतर्गत एकूण १ लाख ६१ हजार ७२० विद्यार्थी पात्र होते. त्यातील ७५ हजार ८९६ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले.
यापैकी १८ हजार ७०२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय, १४ हजार १७७ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि १० हजार ९५० विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.
दुसऱ्या प्रवेश यादीतील पात्र विद्यार्थ्यांना ३ जुलै (सकाळी १० पासून) ते ५ जुलै (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत प्रवेश निश्चित करायचा आहे.
——-
