राजकीय

महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार शिवसेना भाजप सरकारमध्ये सहभागी

मुंबई, दि. २
महाराष्ट्राच्या राजकारणात आज (रविवारी) राजकीय भूकंप झाला. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीस आमदारांनी शिवसेना- भाजप युतीला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

आज दुपारी राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांनी सर्वांना मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *