राष्ट्र सेविका समितीतर्फे स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
डोंबिवली, दि. २०
राजमाता जिजाऊ यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्र सेविका समितीच्या डोंबिवली शाखेतर्फे २६ ते ३० जून या कालावधीत युवती आणि महिलांसाठी स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
टिळकनगर विद्यामंदिर, डोंबिवली पूर्व येथे संध्याकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत हे शिबिर होणार आहे. शिबिरासाठी नावनोंदणी करणे आवश्यक असून http://surl.li/idbzd येथे नोंदणी करता येणार आहे.
शिबिरासाठी २०० रुपये देणगी शुल्क आकारण्यात येणार आहे. रसिका जोशी ( 9819406563) किंवा अदिती बेहेरे (9820372941) यांच्याशी संपर्क साधून याच क्रमांकावर शुल्क पाठवता येईल.
शिबिरात अनुभवी प्रशिक्षकांकडून पाच दिवस स्वसंरक्षण, प्रासंगिक विरोध करण्यासाठीची कौशल्ये इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. काही बौद्धिक सत्रेही घेण्यात येणार आहेत.
——