Wednesday, June 10, 2026
Latest:
वाहतूक दळणवळण

मुंबई ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस २७ जूनपासून सुरू

मुंबई, दि. २०
मुंबई ते मडगाव वंदे भारत २७ जूनपासून सुरू होणार असून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. मडगाव रेल्वे स्थानकावरून ही गाडी सुटणार आहे.‌

मुंबई ते मडगाव वंदे भारत ३ जून रोजी सुरू होणार होती. मात्र आदल्या दिवशी बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.

मुंबई ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेससह पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर आणि बंगळूरू-हुबळी-धारवाड या वंदे भारत एक्स्प्रेसही २७ जूनपासून सुरू होणार आहेत.

मुंबई ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेला थिविम, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे, दादर या रेल्वे स्थानकांत ही गाडी थांबणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ५.२५ वाजता गाडी सुटणार असून दुपारी १.१५ वाजता मडगाव येथे पोहोचणार आहे. दुपारी २.३५ वाजता मडगाववरून सुटून रात्री १०.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचणार आहे.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *