कोकण रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक
मुंबई, दि. २०
कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान देखभालीच्या कामासाठी उद्या (बुधवार) तीन तासांचा ‘मेगाब्लॉक’ घेण्यात येणार आहे.
सकाळी साडेसात ते साडेदहा या कालावधीत हा मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होणार आहे.
दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस रोहा ते रत्नागिरी दरम्यान अडीच तास तास थांबविण्यात येणार आहे.आहे. तसेच
कोकणकन्या एक्सप्रेस, मांडवी एक्स्प्रेसही थांबविण्यात येणार आहेत.
सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेस ही गाडी सावंतवाडी रोड – कणकवली दरम्यान अर्धा तास थांबविण्यात येणार आहे.
—-
