ठळक बातम्या

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ प्रभागात आपत्कालीन विभागीय नियंत्रण कक्ष सुरू

मुंबई, दि. १३
पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संपर्क साधता यावा यासाठी मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या धर्तीवर बृहन्मुंबई महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये मनुष्यबळासह विभागीय नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.

नागरिकांना एखाद्या दुर्घटनेची माहिती महापालिकेला देण्यासाठी आणि नागरिकांच्या मदतीसाठी महापालिकेने ही यंत्रणा सज्ज केली आहे. प्रत्येक नियंत्रण कक्षांमध्ये थेट दूरध्वनी सेवा, बिनतारी संदेश यंत्रणा, चार हॉट लाईन्सही कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

या हॉटलाईन्सद्वारे मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष, संबंधित परिमंडळीय सहाय्यक पोलीस आयुक्त, स्थानिक अग्निशमन केंद्र व शहर आपत्ती व्यवस्थापन संस्थेतील पर्यायी नियंत्रण कक्ष यांच्याशी तात्काळ संपर्क साधता येणार आहे.

महापालिकेच्या dm.mcgm.gov.in या संकेतस्थळावर,
Disaster Management BMC या भ्रमणध्वनी ॲपवर प्रशासकीय विभागातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक मिळू शकतील.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *