सामाजिक

गेल्या वर्षी पावसाळ्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने मदत मिळणार

दीड हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी
मुंबई, दि. १३
गेल्या वर्षी पावसाळ्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता सुधारित दराने मदत मिळणार आहे. त्यासाठी दीड हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नवीन सुधारित दराप्रमाणे जिरायत जमिनीसाठी ८ हजार पाचशे तर बागायत जमिनीसाठी १७ हजार रुपयांप्रमाणे मदत मिळणार आहे.
—

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *