धर्म संस्कृती

उलवे येथील श्री वेंकटेश्वरा स्वामी मंदिर उभारणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व सहकार्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उलवे, दि. ७
तिरूमला तिरुपती देवस्थानतर्फे उलवे, सेक्टर १२, नवी मुंबई येथे उभारण्यात येणा-या श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिरासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उरण तालुक्यातील उलवे येथे दिले.

श्री मनुदेवी, पारोळा बालाजी मंदिरांसह जळगावमधील ३४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता – महाराष्ट्र मंदिर महासंघाची माहिती

सुमारे दहा एकर परिसरात साकारणाऱ्या या मंदिराचे भूमीपूजन मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

मुलांच्या मनात सांस्कृतिक पर्यावरण रुजवणे गरजेचे- प्रा. प्रवीण दवणे

प्रत्येकाला आंध्र प्रदेश राज्यात जाऊन तिरुपती बालाजीचे दर्शन घेणे जमत नाही. अशा भाविकांना येथे बालाजीचे दर्शन घेता येणार आहे. हा भूमीपूजन सोहळा आनंददायी असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा दिवस मंगलमय आणि गौरवशाली आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
तिरूमला ट्रस्टचे अध्यक्ष रेड्डी यांनी नियोजित मंदिराविषयी माहिती दिली.

शनिशिंगणापूर देवस्थानातील बांधून ठेवलेली महाघंटा ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या मागणीनंतर भाविकांसाठी खुली

पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले, रेमंड समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, तिरूमला देवस्थानचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यावेळी उपस्थित होते.

श्री विशाल गणपती मंदिरासह अहिल्यानगर (नगर) येथील १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार – महाराष्ट्र मंदिर महासंघाची माहिती
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *