* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> श्री विशाल गणपती मंदिरासह अहिल्यानगर (नगर) येथील १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार – महाराष्ट्र मंदिर महासंघाची माहिती – मुंबई आसपास मराठी
धर्म संस्कृती

श्री विशाल गणपती मंदिरासह अहिल्यानगर (नगर) येथील १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार – महाराष्ट्र मंदिर महासंघाची माहिती

मुंबई, दि. ३
मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी नागपूर, अमरावतीनंतर आता अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) येथील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून देण्यात आली.

नागपूर येथील चार मंदिरात वस्त्रसंहिता लागू

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांच्या उपस्थितीत विविध मंदिरांचे विश्वस्त, व्यवस्थापन मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बुरख्याच्या सत्तीला मूर्खपणा म्हणण्याची हिंमत छगन भुजबळ दाखवतील का ?

अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरसह श्री तुळजाभवानी माता मंदिर बुराणनगर; श्रीशनी-मारुती मंदिर माळीवाडा; श्री शनि-मारुती मंदिर दिल्ली गेट; श्री शनि-मारुती मंदिर, झेंडीगेट; श्री तुळजाभवानी मंदिर, सबजेल चौक; श्रीगणेश राधाकृष्ण मंदिर मार्केट यार्ड; श्रीराम मंदिर पवननगर सावेडी; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर वाणीनगर या मंदिरांसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदिरांमध्ये येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत वस्त्रसंहिता लागू करण्याचे जाहीर करण्यात आले.


—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *