मनोरंजन

देव आनंद यांच्या चित्रपटातील गाण्यांची ‘तारोंकी मेहफिल’! – टाळ्या, शिट्ट्या आणि अवधूत गुप्तेची धमाल

डोंबिवली, दि. ७
डी. पी. म्हैसकर फाऊंडेशन आयोजित ‘सुश्राव्य शोध’ गायन स्पर्धेच्या आजवर झालेल्या पर्वातील विजेत्या स्पर्धकांच्या गाण्यांचा ‘ तारोंकी मेहफिल’ हा कार्यक्रम रविवारी सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात अभिनेते देव आनंद यांच्या चित्रपटातील गाणी गायक,गायिकांनी सादर केली. गायक संगीतकार अवधूत गुप्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांंचे निधन

कार्यक्रमाचे नेपथ्य, रंगमंच सजावट श्रीराम जोशी यांची तर संकल्पना सचिन अवस्थी यांची होती. ‘सुश्राव्य शोध’ स्पर्धेच्या गेल्या काही वर्षांतील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्यांना एकत्र आणण्याचे काम शुभदा पावगी आणि उदय चितळे यांनी केले.
अनुजा म्हैसकर यांच्या अभंग नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली रायमा आणि त्रिशा यांनी कथ्थक नृत्य सादर केले.

१९ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाची सांगता

‘तारों की मेहफिल’ कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन रेडिओ जॉकी गौरव श्रीवास्तव यांनी केले.
अनघा विद्वांस यांनी गायलेल्या ‘प्रभुतेरो नाम’ या गाण्याने
‘तारों की मेहफिल’ची सुरुवात झाली. ‘फुलो की रंग से’ (राणा जाधव), देखने मे भोला है (आयुषी देवस्थळे), पिया तोसे नैना लागे रे “(सुरभी देवस्थळी), कभी खुद पे ( प्रणव पाटील),
जारे जारे उड जा रे पंछी (मधुरा शेवडे), दिल का भवर करे पुकार (अभिजीत करंजकर), तू कहा ये बता (साहिल जोशी), मोसे छल (रेश्मा कुलकर्णी), तेरी जुल्फो से (सुकांत जावडेकर), ये दिल ना होता बेचारा (ओंकार प्रभूघाटे), तेरे मेरे सपने (निषाद वैद्य), खोया खोया चाँद (भगवान कुलकर्णी), आया हो (नंदन जोशी),
जाता कहा है ( मानसी जोशी), दिवाना मस्ताना (सुषमा धुरी),जिया हो (धवल भागवत), हुस्न के लाखो रंग (पूजा देशपांडे), रात अकेली है (अनन्या नाईक) ही गाणी सादर झाली.

दादासाहेब फाळके चित्रनगरीतील पायाभूत सोयी-सुविधा आणि विकास कामांसाठी शासनाकडून शंभर कोटींचा निधी

निशाद करलगीकर, प्रभाकर भोसेकर ,संतोष दिवेकर ,आशिष आरोसकर ,संदीप पेडणेकर, किरण गायकवाड, संदीप कुलकर्णी, किशोर नारखेडे, नागेश कोळी यांनी संगीत साथ केली. संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे होते. सादर झालेल्या गाण्यांमधून अनन्या नाईक, पूजा देशपांडे यांची ‘ कोहिनूर’ म्हणून निवड करण्यात आली.

निसर्ग गीतांवर आधारित ‘सृष्टीगान’ कार्यक्रमाचे आयोजन

प्रमुख पाहुणे या नात्याने मनोगत व्यक्त केल्यानंतर अवधूत गुप्ते यांनी कोणतेही आढेवेढे न घेता प्रेक्षकांच्या फर्माइश पूर्ण करत बाई बाई मन मोराचा, डिपाडी डिपांग, कांदे पोहे, जय जय महाराष्ट्र माझा ही गाणी सादर केली आणि संपूर्ण सभागृह टाळ्या, शिट्ट्यांनी दणाणून गेले. डी. पी. म्हैसकर फाउंडेशनच्या सुधाताई म्हैसकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *