मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक
मुंबई दि.१८ :- दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी उद्या (१९ मार्च) मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार रेल्वे स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत या वेळेत हा मेगाब्लॉक असणार आहे.
पाच मेट्रो स्थानकांवर वाहनतळाची सशुल्क सुविधा उपलब्ध
या मेगा ब्लॉक मुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४० या वेळेत सुटणाऱ्या धिम्या मार्गावरील उपनगरी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.
मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प सोमवारी सादर होणार
भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर या लोकल थांबून पुढे पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तसेच घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ यावेळेत अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांत अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे.
