Saturday, July 11, 2026
Latest:
ठळक बातम्या

मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प सोमवारी सादर होणार

मुंबई दि.१८ :- मुंबई विद्यापीठाची अर्थसंकल्पीय बैठक सोमवारी (२० मार्च ) रोजी आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत मुंबई विद्यापीठाचा २०२३-२४ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

अनिक्षा जयसिंघानीला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

या बैठकीस दहा नामनिर्देशित अधिसभा सदस्य आणि प्रभारी कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव आदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अधिसभा सदस्यांची निवडणूक अद्याप होऊ न शकल्याने अर्थसंकल्पीय बैठक आणि अर्थसंकल्प सादरीकरण निर्वाचित अधिसभा सदस्यांविनाच होणार आहे.

निवृत्ती वेतन योजनेविषयी भारतीय मजदूर संघातर्फे परिसंवादाचे आयोजन

गेल्या सहा महिन्यांपासून मुंबई विद्यापीठातील कुलगुरू, प्र. कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, विद्यार्थी कल्याण विभाग संचालक ही पदे प्रभारी स्वरूपात आहेत, अद्यापही या पदांसाठी पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *