महापालिका प्रशासनाकडून साडेचार हजार कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल
मुंबई दि.१० :- बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने एप्रिल २०२२ ते ८ मार्च २०२३ या कालावधीत ४ हजार ५०० कोटी रुपये मालमत्ता कर जमा केला आहे. मार्च अखेरपर्यंत मालमत्ता कर वसुलीचा ६ हजार कोटी रुपयांचा टप्पा पार करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.
मुंबई विद्यापीठात उद्यापासून राष्ट्रीय वसंत नाट्योत्सव
५०० चौरस फुटांखालील घरांना कर माफी दिल्याने महापालिकेला वर्षाला ४६४ कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे उर्वरित मालमत्ता धारकांकडून वर्षांला सहा हजार कोटी रुपये मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. मुंबईत साडेतीन लाख मालमत्ता असून या मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कर वसूल करण्यात येतो.