मुंबई विद्यापीठात उद्यापासून राष्ट्रीय वसंत नाट्योत्सव
नाट्य रसिकांना विनामूल्य प्रवेश
मुंबई दि.१० :- मुंबई विद्यापीठाच्या ‘अकॅडेमी ऑफ थिएटर आर्टस्’ विभागातर्फे ११ ते १८ मार्च या कालावधीत वसंत राष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा नाट्य महोत्सवाचे १३ वे वर्ष आहे. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपुर आणि दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांचे विशेष सहकार्य या नाट्य महोत्सवासाठी लाभले आहे. विद्यापीठाच्या कलिना संकुलातील ‘मराठी भाषा भवन’ च्या नाट्यगृहात ११ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता ज्येष्ठ नाटककार-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी हे प्रमुख पाहुणे तर अध्यक्ष म्हणून मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू मा. प्रा. डी. टी. शिर्के, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
क्षयरोग नियंत्रणासाठी जे जे रुग्णालयाला मानांकन
११ मार्च रोजी महोत्सवाच्या उदघाटनानंतर ‘स पा न, नाशिक’ या संस्थेच्या दत्ता पाटील लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित ‘तो राजहंस एक’ हे नाटक सादर होणार आहे. नाट्यमहोत्सवामध्ये भारतातील विविध नामांकित संस्था सहभागी होणार असून विशेषतः झारखंड, नैनिताल, गुजरात, गोवा या राज्यांसह मुंबई, नाशिक, अहमदनगर येथील नाट्यसंस्थांचे प्रयोग सादर होणार आहेत. १८ मार्च रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता नाट्य महोत्सवाचा समारोप होणार असून ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहोनी, नाटककार अभिराम भडकमकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्या नंतर संध्याकाळी ७.३० वाजता ‘आधे अधुरे’ हे नाटक सादर होणार आहे.
पार्सल महसूलाच्या माध्यमातून मध्य रेल्वेला २३२. ५० कोटी रुपयांचा विक्रमी महसूल
मुंबई विद्यापीठाच्या ‘ॲकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्’चे संचालक योगेश सोमण, महोत्सवाचे प्रमुख प्रा. डॉ. मंगेश बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा नाट्योत्सवाची आखणी करण्यात आली आहे. नाट्योत्सवास रसिक प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश असून जास्तीत रसिकांनी या नाट्योत्सवास उपस्थित राहावे, असे आवाहन योगेश सोमण यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क ९९२०४२०३८८/ ९८९२१४३१६३
नाट्य महोत्सवात सादर होणारी अन्य नाटके-
रविवार १२ मार्च, दुपारी ४ वाजता ‘३ मेन’
संध्याकाळी ७.३० वाजता ‘सेम सेम बट डीफरंट’
सोमवार १३ मार्च, दुपारी चार वाजता‘ ‘राशोमान’
संध्याकाळी ७.३० वाजता ‘दास्तान-ए-रामजी’
मंगळवार १४ मार्च, दुपारी ४ वाजता ‘सावरबेट’
बुधवार,१५ मार्च, दुपारी ४ वाजता ‘स्त्री, जातं, ओवी आणि कविता’
संध्याकाळी ७.३० वाजता- ‘पगला घोडा’
गुरुवार १६ मार्च, दुपारी चार वाजता ‘खटारा’
संध्याकाळी ७.३० वाजता, ‘लहरों के राजहंस’
शुक्रवार १७ मार्च, दुपारी ४ वाजता ‘आमचं तुमचं नाटक’