संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी
गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
हक्कभंगावर येत्या ८ मार्च रोजी निर्णय घेण्यात येणार
मुंबई दि.०१ :- खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून विधिमंडळ अधिवेशनातही राऊत यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटले. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना पत्र दिले असून राऊत यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्यात यावा, अशी मागणी भातखळकर यांनी या पत्रात केली आहे.
घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महाग
दरम्यान या गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. संजय राऊतांविरोधीतील हक्कभंगावर येत्या ८ मार्च रोजी निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यात विधिमंडळ नाही, तर चोरमंडळ आहे, असे वादग्रस्त वक्तव्य राऊत यांनी कोल्हापूर येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केले होते. राऊत यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून आज विधानसभेतही मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला. संजय राऊतांनी विधिमंडळाला चोर मंडळ म्हटले आहे. विधिमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला.
राज्य शासन सीमा भागातील जनतेच्या पाठीशी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
एखाद्याचा राजकीय अभिनिवेश काहीही असू शकतो. विविमंडळाला चोर म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान असून तो महाराष्ट्रद्रोह आहे, असे भाजपचे आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपण शेलार यांच्या मताशी सहमत आहोत. राजकीय मतभेद बाजुला ठेवून हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मात्र, संजय राऊत खरोखरच बोलले का? हे सुद्धा तपासण्याची गरज आहे, असे सांगितले. कॉंग्रेसचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात, भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि अन्य सदस्यांनीही विचार मांडले.
