ठळक बातम्या

राज्यभरातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १ हजार ५०० ची वाढ

मुंबई दि.०१ :- राज्यभरातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १ हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी दिली.‌ या बैठकीनंतर संप मागे घेत असल्याचेही पाटील यांनी जाहीर केले.

संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी

गेल्या काही वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू होते. या आंदोलनाचे विधानसभेतही उमटले. याप्रश्नी राज्य सरकारने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.

घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महाग

त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत विशेष बैठक विधान भवनात पार पडली. अंगणवाडी सेविकांसाठी अर्थसंकल्पात १३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे एम. ए. पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *