कोकण रेल्वेवर आणखी चार लांब पल्ल्यांच्या गाड्या विद्युत इंजिनावर धावणार
मुंबई दि.२३ :- कोकण रेल्वेवर धावणाऱ्या आणखी चार लांब पल्ल्यांच्या गाड्या डिझेल इंजिन ऐवजी विद्युत इंजिनावर चालविण्यात येणार आहेत.
एर्नाकुलम – ओखा – एर्नाकुलम एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम सेन्ट्रल एक्सप्रेस- वेरावल – तिरुवनंतपुरम सेन्ट्रल एक्सप्रेस गाडी तिरुवनंतपुरम सेन्ट्रल ते अहमदाबाद स्थानकांदरम्यान, नागरकोइल – गांधीधाम – नागरकोइल साप्ताहिक एक्सप्रेस आणि एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस यांचा समावेश आहे.
मुंबईकरांच्या वीज देयकात ५० रुपयांनी वाढ होणार; महावितरण पाठोपाठ अदानी, टाटा यांची याचिका
कोकण रेल्वेमार्गावरील बहुतेक सर्व रेल्वेगाड्या टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिनावर चालविण्यात येत आहेत. या गाड्या विद्युत इंजिनावर धावू लागल्यानंतर डिझेलसाठी लागणाऱ्या खर्चात वर्षाला १५० कोटी रुपयांची बचत होणार आहे आहे.