नववर्षाचे स्वागत आणि जल्लोषावर वाहतूक पोलिसांची नजर
मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई, दि. २८
करोनानंतर तब्बल दोन वर्षांनी मुंबई शहर आणि उपनगरात नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात येणार आहे. या सर्वांवर वाहतूक पोलिसांचे नजर असणार आहे.
अनिल देशमुख यांची उद्या तुरुंगातून सुटका होणार
शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून अनेक ठिकाणी वाहतूकीत बदल करण्यात येणार आहे. बेदरकार आणि मद्यपी वाहनचालकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. दोन हजार वाहतूक पोलीस तैनात केले जाणार आहेत. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकाची ब्रेथ ॲनालायझर तपासणी केली जाणार आहे.
राष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत निखत झरीन, लवलिनाअंतिम फेरीत
वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ४ पोलीस उपायुक्त, ४ हजार वाहतूक पोलीस कर्मचारी, वाहतूक वॉर्डन, स्वयंसेवक यांची मदत घेतली जाणार आहे. अनेक मार्ग बंद केले जाणार असून शहरात अनेक ठिकाणी एकेरी मार्ग वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.
मुंबईत स्मार्ट वीज मीटर, बेस्ट प्रशासनाचा निर्णय
श्यामप्रसाद मुखर्जी चौक ते गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारा रस्ता पुढे रेडिओ क्लबकडे जाणारा रस्ता एक दिवसाच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे ‘चित्रपटाचा दुसरा भाग नव्या वर्षात- निर्माते मंगेश देसाई
गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारे रस्ते, नेताजी, सुभाष रोड, मरीन ड्राईव्ह, गफारखान रोड, वरळी सी फेसला लागून असलेला रस्ता, जुहू तारा रोड या रस्त्यांवर सायंकाळी ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत नो पार्किंग झोन राहणार आहे.
——