‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे ‘चित्रपटाचा दुसरा भाग नव्या वर्षात- निर्माते मंगेश देसाई
ठाणे, दि. २७
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाचा दुसरा भाग नव्या वर्षात प्रेक्षकांना पाहायला मिळेल, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी येथे दिली.
गोव्यातील आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात आठ मराठी चित्रपट
२७ डिसेंबर २०२१ रोजी कोलशेत येथे या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. त्यावेळी तिथे उभारण्यात आलेल्या जुन्या आनंदआश्रम प्रतिकृतीच्या वर्षपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी बोलताना देसाई यांनी ही माहिती दिली.
चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणारे अभिनेते प्रसाद ओक यांच्यासह चित्रपटातील सर्व कलाकार, चित्रपटाच्या चमूतील सहकारी यावेळी उपस्थित होते.
१९ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाची सांगता
धर्मवीर आनंद दिघे यांचे अनेक पैलू अद्याप गुलद्त्यातच आहेत, जे लोकांपर्यत पोहोचलेले नाहीत. दुसऱ्या भागात त्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत, असेही देसाई म्हणाले.