अंबरनाथ गोळीबार प्रकरणी एकाला अटक
बैल गाडा शर्यत वाद
(ठाणे आसपास प्रतिनिधी)
ठाणे दि.१४ :- अंबरनाथ येथील आनंदनगर औद्योगिक वसाहतींमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी खांदेश्वर पोलीसांनी रविवारी रात्री पंढरी फडके याला अटक केली. त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
गोळीबारात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र रस्त्यावरून सर्वसामान्य प्रवाशांची जा- ये सूरु असताना ही घटना घडली होती. पंढरी फडके आणि त्याच्या साथीदारांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बैलगाडा शर्यतीवरुन दोन गटातील वादावर तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीदरम्यान वाद सुरु झाला आणि पंढरी फडके गटाने कल्याणच्या राहुल पाटील गटावर गोळीबार केला होता. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांतूही फिरला होता.