उद्योग व्यापार

अन्न आणि औषध प्रशासनाच्या निषेधार्थ २३ नोव्हेंबर रोजी व्यापारी संघटनांचे आंदोलन

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.१४ :- अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ येत्या २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यभरात मोर्चा, धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.‌

अखिल भारतीय व्यापारी महासंघातर्फे विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक रविवारी चेंबूर येथे आयोजित करण्यात आली होती.‌ त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.‌

या बैठकीस ‘कॅट’च्या महाराष्ट्र चॅप्टरसह ठाणे खाद्यपेय व मिष्ठान्न असोसिएशन, पुणे रिटेल मर्चंट असोसिएशन, सुकामेवा व मसाला मिल निर्यात असोसिएशन, मांडवी ग्रेन मर्चंट डीलर असोसिएशन, मांडवी मेवा मसाला मर्चंट असोसिएशन नवी मुंबई, महाराष्ट्र डेअरी प्रॉडक्ट डीलर्स असोसिएशन, मावा उत्पादक असोसिएशन या प्रमुख संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अन्न आणि औषध प्रशासनाकडून वारंवार विनाकारण छापे टाकले जातात, खंडणीसारखा भरमसाठ दंड आकारला जातो यामुळे व्यापारी त्रस्त झाल्याचा आरोप अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) केला.

२३ नोव्हेंबर रोजी व्यापारी संघटनांतर्फे राज्यभरात मोर्चे काढण्यात येणार असून धरणे आंदोलन करून करण्यात येणार आहे. त्या त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात येणार आहे. येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत सरकार आणि प्रशासनाने भूमिका न बदलल्यास २६ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *