‘महावितरण’ भरारी पथकाच्या धाडीत ६ लाखांहून अधिक रुपयांची वीज चोरी उघड
डोंबिवली आसपास प्रतिनिधी
डोंबिवली- डोंबिवली पश्चिमेतील काही भागात ‘महावितरण’ भरारी पथकाने धाड टाकून २० रहिवाशांच्या घरातील ६ लाख ४ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली. दोन ठिकाणी मुख्य वीज वाहिनीशी घरगुती वीज वाहिनीची जोडणी करुन वीज चोरी करण्यात येत होती.
मुंबई विमानतळावर ३२ कोटी रुपयांचे ६१ किलो सोने जप्त
‘ महावितरण’च्या एकूण ११ पथकांनी नवापाडा, गावदेवी परिसर, ठाकूरवाडी, रेतीबंदर परिसरात १९३ वीजजोडण्यांची तपासणी केली. घरे, बंगले अशा २० ठिकाणी ६ लाख ४ हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली.
सारस्वत कॉलनीतील श्री विवेकानंद सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सुवर्ण महोत्सव
या सर्वांना वीजचोरीचे देयक आणि तडजोडीची रक्कम भरण्याबाबत सांगण्यात आले आहे. विहित मुदतीत ही रक्कम न भरणाऱ्यांविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसात फिर्याद देण्यात येणार आहे. तर दोन ठिकाणी आढळलेल्या अनधिकृत वीजवापर प्रकरणी कलम १२६ प्रमाणे कारवाई करण्यात आली.
वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच बैठक